Friday, April 26, 2024
Homeनगरशेतकर्‍याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

शेतकर्‍याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील (Nagar Taluka) ससेवाडी (Sasewadi) येथील शेतकरी दिलीप अण्णा मगर (वय 53) यांनी कर्जाला (Loan) कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी, मगर यांच्याकडे सेवा सोसायटी (Service Society) व विविध बँकांचे कर्ज (Bank Loan) होते. सात एकर क्षेत्र नावावर असून गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली नैसर्गिक आपत्ती व करोनाच्या महामारीमुळे ते कर्ज फेडू शकले नाहीत. ससेवाडी गाव कांदा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि कांदा पिके वाया गेली. कांदा लागवडीसाठी मोठा खर्च येत असून खराब हवामानामुळे कांदा पिक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कांदा लागवडीसाठी (Onion Planting) उत्पन्नाच्या भरवशावर कर्ज (Loan) काढून कांदा (Onion) लागवड केली. परंतु हवामानाने साथ न दिल्याने झालेला खर्च देखील वसूल न झाल्याने मगर यांनी कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली. शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या