Thursday, April 25, 2024
Homeजळगावशेतातील मोटारीचा शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू

शेतातील मोटारीचा शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शेतात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकर्‍याला शेतातील पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी धानोरा शिवारातील शेतात घडली. सुनिल खंडू धनगर (वय-30) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील धानोरा गावात सुनिल खंडू धनगर (वय-30) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचे धानोरा शिवारात शेत असून तो नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुनिल धनगर हा शेतात गेला होता. त्यावेळी शेतात पाणी देण्यासाठी विहीरीजवळील ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्याचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर शेजारील शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने धाव घेवून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, पत्नी सोनूबाई, भाऊ कैलास, दोन विवाहित बहिणी आणि तीन मुली असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या