Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादिवाळीच्या सुट्याांसाठी नशिकला 'इतक्या' जादा गाड्या उपलब्ध

दिवाळीच्या सुट्याांसाठी नशिकला ‘इतक्या’ जादा गाड्या उपलब्ध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवाळीच्या सुट्याांचा (Diwali holidays) आनंद घेण्यासाठी मित्र परिवारासह पर्यटनासाठी (Tourism) जाणाऱे प्रवाशी व खांंदेशात दिवाळीसाठी जाणार्‍या माहेरवाशीनी मुळे एसटी स्थनाकांवर गर्दी वाढली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) यंदा राज्यभरात ’दिवाळी स्पेशल’ 1494 जादा गाड्या सोडण्यास सुरवात केली ओहे नशिकला (nashik) पावणे तीनशे जादा गाड्या उपलब्ध झाल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत या गाड्या धावणार आहेत. दहा ट्क्के भाडेवाढ झाली असली तरी ज्येष्ट नागरीकंना मोफत प्रवास असल्याने यंदा कधी नव्हे एवढा ज्येष्ठांचा प्रतीसाद एसटी बसला (ST Bus) मिळाला आहे.

दिवाळीच्या सुट्टीत (Diwali holidays) महाविद्यालये (college) व शाळांना (school) पाच नोव्हेबर पर्यंत सुट्टया आहेत. त्यातच सरकारी कर्मचार्‍यांनी यंदा पर्यटनाचा आनंद घेण्याचा निर्धार केला आहे. बहुतांशी कुटुुंबीय मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करत आहे. तसेच नोकरी, कामधंद्या निमित्ताने बाहेर असणारे कर्मचारीही दिवाळीसणात आपल्या घरी जाऊ लागले आहेत.

सर्व घटकातील प्रवाशी एसटीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात (diwali festival) जोडून आलेल्या सुट्ट्या मुळे एसटी महामंडळाने नियमित बस फेर्‍या बरोबरच 1494 जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. नाशिक 274 गाड्या सोडण्यात येत आहे.

एसटी महामंडळाने (ST Corporation) ’अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत 75 वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून 50 टक्के सवलत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घेण्यास सुरवात केली आहे. तेही मुलींना आता तु नको मिच येतो, असे सांगुन एसटीने रवाना होत आहे. मोफत प्रवास सवलतीचे असेही परीणाम आता दिसत आहे.नाशिक मधुन मालेगाव , सटाणा, धुळे. जळगाव, नंदुरबारकडे जाणार्‍या बसेस गच्च भरुन जात आहे.

गेली दोन वर्ष कोरोना निर्बंघा मुळे कोणाला फारसे कोणाकडे जाता आले नाही. ती सर्व कसर यंदा भरुन काढली जात आहे. खाजगी ट्रॅव्हल बसचे गेल्या काही महीन्यमध्ये विविध ठिकाणी अपघात झाले. नाशिक शहरातही औरंगाबाद रोडवर खाजगी ट्रॅव्हल बसचा मोठा अपघात होवून बारा जणांना प्राणास मुकावे लागले. यामुळे अनेक जण एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे पसंत क रत आहे. त्यामुळे बस स्थानकावर अधिक गर्दी वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या