Thursday, April 25, 2024
Homeधुळेलोखंडी अँगल लांबविणार्‍या टोळीचा पर्दाफार्श

लोखंडी अँगल लांबविणार्‍या टोळीचा पर्दाफार्श

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील लळींग शिवारातील एमआयडीसीतून (MIDC) लोखंडी अँगल (Iron Angle) लांबविणार्‍या (Protractors) चोरट्यांच्या टोळीचा (gang of thieves) मोहाडी पोलिसांनी (police) पर्दाफार्श केला असून एका चोरट्याला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एकुण 56 हजार 700 रुपये किंमतीचे 27 अँगल हस्तगत करण्यात आले. त्याच्या चौंघा साथीदारांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

एमआयडीसीतील प्लॉट नं.एच-6 मधील पत्र्याचे अर्धवट शेडमधून दि.19 ते 20 जुलैदरम्यान अज्ञात चोरट्यांनी 27 अँगल लंपास केले होते. याप्रकरणी विवेक दिनकर सोनवणे (वय 55 रा.गणेश निवास प्लॉट नं.6/7, बोरसे नगर, गोंदूर रोड, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मोहाडीनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात सपोनि भुषण कोते यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोना राहुल पाटील यांनी शोध पथकासह गुन्ह्याचा तपास करुन प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झालेल्या दिवशीच संशयित अर्जून मंगा अहीरे (वय 23 रा.दिवानमळा ता.धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देवुन गुन्ह्यात सहभागी चौंघा साथीदारांचीही नावे सांगितली. उर्वरीत चार आरोपी फरार असून त्यांचाही शोध सुरु आहे.

अटकेतील अर्जुन अहीरेच्या ताब्यातून गुन्ह्यातील एकुण 56 हजार 700 रुपये किंमतीचे 27 लोखंडी अँगल हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रविण पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भुषण कोते, पोहेकॉ शाम काळे, पोना राहुल पाटील, पोकॉ गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, मुकेश मोरे, राहुल गुंजाळ, समीर पाटील, धिरज गवते, जयकुमार चौधरी यांनी केली आहे. या कामगिरीचे पोलिस अधिक्षकांनी कौतूक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या