निर्यात बंदीने शेतकर्‍यांचे नुकसान

jalgaon-digital
2 Min Read

बोधेगाव |वार्ताहर| Bodhegav

पूर्वी केंद्र सरकारमध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण असणारी मंडळी होती. तेव्हा शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले. मात्र, आज देशात साखर उत्पादन वाढले आहे. तसेच ब्राझीलमध्ये दुष्काळ असून उत्पादन घटले असल्याने तेथे साखर निर्यात करण्यास मोठी संधी आहे. परंतु शेतकर्‍यांच्या हित केंद्र शासनाला पाहवत नाही. शेतकर्‍यांच्या हातात पैसे येऊ लागले की धोरणे बदलली जातात.

सध्याही साखर आणि गव्हातून शेतकर्‍यांना बरे पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतांना या दोन्हींच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यात आले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसान होणार असून याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे.असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता. शेवगाव) येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते. खा. पवार म्हणाले, साखर एके साखर असे दिवस आता राहिले नाहीत. साखरे बरोबर अल्कोहोल, इथेलॉन, वीज सारखे प्रकल्प भविष्यात हाती घेऊन उत्पादक शेतकर्‍यांच्या उसाला इतरांपेक्षा जादा दर देण्यास मदत होणार आहे. धनंजय गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करून सहकारी साखर कारखानदारी उभी केली.

नगर जिल्यात बाबुराव तनपुरे, लोकनेते मारुतराव घुले यांनी साखर कारखाने उभे करून विकासाला चालना दिली. दूरदृष्टी संघर्षशील बबनराव ढाकणे यांनी बाळासाहेब भारदे, माधवराव निर्हाळी यांच्या सोबत स्वातंत्र्य चळवळीतून संघर्ष करून आयुष्यभर जनतेची सेवा केली. सरपंच पदापासून विविध सर्वाधिक पदे उपभोगली काहीच शिल्लक ठेवले नाही. खा. पवार यांनी केंद्र शासनाच्या साखी धोरणांवर जोरदार टिका केली. परंतु जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या असतानाही अतिरिक्त ऊसाबाबत त्यांनी बोलण्यास टाळले.

ऊस, तांदळापासून इथेनॉलला परवानगी

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन ढाकणे यांना शुभेच्छा देऊन देशात साखर उत्पादन वाढले असून गणित बिघडले असल्याचे सांगितले. 260 लाख टन गरज असतांना 80 लाख टन जादा साखरेचे उत्पादन वाढले आहे. भविष्यात साखरेऐवजी उस व तांदळापासून इथेलॉनला परवानगी दिली जाणार आहे. त्यापासून मोलेसेस व इथेलॉन निर्मिती करून काही महिन्यांत चार, दुचाकीसह विविध गाड्या बायोडिझेलवर येणार आहेत. भविष्यात एक लिटर पेट्रोल बरोबर एक लिटर बायोडिझेल वापरण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *