महागडी कार आढळली तलावात; गूढ उकलेना

पंचाळे l Panchale (वार्ताहर)

पंचाळे पांगरी रस्त्यालगत असलेल्या तलावात चारचाकी वाहन पाण्यात पडलेली दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंचाळे पासून 200 मीटर अंतरावर असलेल्या पंचाळे पांगरी रस्त्याच्या पूर्व बाजूकडील तलावात सकाळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या नजरेस एक महागडे चार चाकी काळ्या रंगाची कार पाण्याच्या मध्यभागी पडलेली ग्रामस्थांनी पहिली.

पाण्यामध्ये कार सरळ उभी असून काचा व दरवाजे उघडे असल्याने गाडीमध्ये पूर्ण पाणी शिरले आहे. यामुळे गाडीचा नंबर आढळून आला नाही.

यावरून रात्री ही कार रस्त्यावरून थेट 25 फूट खोल असणाऱ्या तलावात पडली. तलावामध्ये पाण्याचा मोठा साठा आहे. तसेच या तलावांमध्ये मुरूम माती काढल्याने मोठमोठे खड्डे झाले आहे. गाडीच्या छतापर्यंत पाणी गेले होते.

ग्रामस्थांनी गाडीमध्ये कोणी अडकले किंवा काही त्याची पाहणी करण्यासाठी काही व्यक्तींनी गाडी जवळ जाऊन शोध घेतला. त्यावेळी गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.