Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकोरोनाबाधित विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी विशेष सवलत

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी विशेष सवलत

औरंगाबाद – aurangabad

(ssc) दहावी-बारावी (hsc) बोर्डाच्या परीक्षेत (corona) कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी विशेष सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच (examination) परीक्षा काळात एखादा विद्यार्थी (student) आजारी पडला अथवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन, प्रात्यक्षिक, सबमिशन करू न शकल्यास लेखी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येणार आहे. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.

- Advertisement -

बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्चदरम्यान तर दहावीची १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान हाेणार आहे. या काळात एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास तो परीक्षेपासून वंचित राहू नये याची काळजी बोर्डाकडून घेतली जात आहे. अशा बाधित विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असणार आहे. या विद्यार्थ्यास जवळच्या आरोग्य केंद्राकडून आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरवली जाणार आहे.

यंदा ज्या ठिकाणी शाळा तेथेच परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा काळात दूरच्या केंद्रावरील प्रवास टळणार आहे. लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल. तसेच पेपर सोडविण्यासाठी देखील अधिकचा वेळ देण्यात येणार असल्याचे बोर्डाने कळविले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा घेतली जाणार आहे. मंडळाकडून हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या