Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच!

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच!

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे उपनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil News) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्या बातम्या खोट्या असल्याते स्पष्टीकरण शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

- Advertisement -

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फेसबुकवरुन आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा’ अभिनंदन मुख्यमंत्री साहेब. असा आशयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटोही आढळरावांनी टाकला आहे. या शुभेच्छा दिल्यानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची थेट शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचं पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या