Friday, April 26, 2024
Homeनाशिकजीवनावश्यक वस्तू अन् सेवाच असतील सुरु; बार, रेस्टांरट, मद्यविक्री बंद : रात्री...

जीवनावश्यक वस्तू अन् सेवाच असतील सुरु; बार, रेस्टांरट, मद्यविक्री बंद : रात्री ८ ते सकाळी ७ संचारबंदी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मंगळवार (दि.६) पासून जारी केलेले कठोर निर्बंध लागू असणार असून जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने, शाॅपिंग माॅल बंद राहणार आहेत.

- Advertisement -

बार रेस्टारंटसह मद्यविक्री दुकाने देखील बंद असणार आहे. हाॅटेलचे किचन फक्त पार्सल सुविधेसाठी सुरु राहणार असून निर्बंधांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ संचारबंदी लावण्यात आली आहे.

राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वानुमेत निर्णय घेत ३० एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बध लागू केले आहे. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदीचे म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र थांबता येणार नाही. तर रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत कुणालाही संयुक्तीक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यानुसार गर्दीची सर्व दुकाने, बाजारापेठा, मॉल्स, खासगी अस्थापणांची कार्यालये, पूर्णपणे बंद करत घरुनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालये, मेडिकल, वैद्यकीय प्रयोगशाळा, किराणा, भाजीपाला, फ‌‌ळे ही सुरुच असतील. औद्योगिक कारखाने, उद्योग, सुरु राहातील. बांधकामाच्या साईटची कामेही सुरु राहातील.

या व्यतिरिक्त इतर सर्वच बाबींची दुकाने, अस्थापणा या बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरु असेल. त्यासाठी नियम ठरवून देण्यात आले असून त्याचे पालन बंधनकारक असणार आहे. रेल्वे अन् बस सुरु असतील. पण बसमध्ये एकूण आसण क्षमतेच्या ५० टक्के इतक्याच प्रवाशांना परवानगी असेल.

ऑटोरिक्शामध्ये चालकासह तीन व्यक्तींना परवानगी असेल. टॅक्सीमध्ये निश्चित केलेल्या प्रवशी क्षमतेपेक्षा ५० टक्केच प्रवाशांना प्रवेश देता यईल. मालवाहतूक सुरु असेल. शासकीय कार्यालयांत ५० टक्के कर्मचारी अन् स्टापला परवानगी देण्यात आली आहे. तसेच कुणालाही पुर्वपरवानगीशिवाय कार्यालयात प्रवेश करता येणार नाही.

अधिकाऱ्यांनाही भेटता येणार नाही. तसेच सुरु असलेल्या अस्थापणांमध्ये मास्कशिवाय कुणालाही प्रवेश नसेल. सार्वजनिक वाहतुकीच्या कुठल्याही साधनातून प्रवास करतानाही मास्क बंधनकारक राहाणार आहे. मास्क नसल्यास संबधितास ५०० रुपये दंड असेल. तसेच ज्या अस्थापणेत त्याचे उल्लंघन होईल, त्या अस्थापणेलाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

मद्य दुकानांसह बार, रेस्टारंट बंदनव्या आदेशानूसार मद्याची दुकाने, बार व रेस्टारंट आणी वाईनशाॅप बंद राहणार आहेत. तसेच हाॅटेलमधील निवासी ग्राहकांना जेवण, मद्याची सुविधा देता येईल. या सेवा देण्यास हाॅटेल आस्थापनांना परवानगी आहे. दरम्यान मद्याची दुकाने बंद करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

प्रतिक्रियाकरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी नवे निर्बंध मंगळवारपासून लागू होत आहे. अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील. नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

छगन भुजबळ, पालकमंत्री

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाने जारी केलेली नियमावली नाशिक जिल्ह्यातही जसेच्या तसेच लागू असून, या आदेशाव्यतिरिक्त जे कठोर निर्बंध नाशिकमध्ये यापुर्वीच लागू करण्यात आले आहेत ते मात्र कायम राहाणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

ठळक मुद्दे


पुढिल २५ दिवस अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

दिवसा जमावबंदी. नियम मोडल्यास हजार रुपये दंड आकारणार

मास्क नसल्यास हजार रुपये दंड

भाजीपाला खरेदी टाळण्यासाठी विक्री केंद्र विखुरले जाणार

एका वेळेस एका ग्राहकालाच भाजी विकता येणार. सोशल डिस्टनन्स महत्वाचे

उद्योगधंदे सुरु राहणार असल्याने कामगारांना ये जा करता येणार

खासगी आस्थापंनाना वर्क फार्म होम

वित्तीय सेवा कार्यालय सुरु राहतील

- Advertisment -

ताज्या बातम्या