Friday, April 26, 2024
Homeनाशिक'इस्पॅलियर' च्या 'या' उपक्रमास 'युनिसेफ युवा वाहिनी चॅलेंज अवॉर्ड'

‘इस्पॅलियर’ च्या ‘या’ उपक्रमास ‘युनिसेफ युवा वाहिनी चॅलेंज अवॉर्ड’

प्रतिनिधी | नाशिक

करोनामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या पाच महिन्यांपासून देशात शाळा महाविद्यालय बंद आहेत. शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणही थांबले होते अशा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नाशिकच्या इस्पॅलियरतर्फे स्कूलने….

- Advertisement -

ऑनलाइन रेडिओ स्कूलची निर्मिती करत अभिनव प्रयोग केला. शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थी डिझाईन फॉर चेंज या प्रकल्प अंतर्गत (डीएफसी) या विद्यार्थ्यांच्या कल्पनेनुसार तयार करण्यात आलेल्या या एज्युकेशन ऑन एअर या उपक्रमाची जागतिक स्तरावर युनिसेफतर्फे दखल घेण्यात आली असून ‘बोल्ड अ‍ॅन्ड अ‍ॅडियसियस कॅटेगरी’ अंतर्गत ‘युनिसेफ युवा वाहिनी चॅलेंज अवॉर्ड’ हा प्रख्यात पुरस्कर जाहीर झाला आहे.

निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन संचालक रामानन रामनाथन यांनी इस्पॅलियर स्कूलला हा पुरस्कार जाहीर केला. युनिसेफ डीएफसीकडून प्राप्त झालेल्या एक हजाराहून अधिक प्रकल्पांमधून एज्युकेशन ऑन एअर (रेडिओ इस्पॅलियरतर्फे) या अनोख्या प्रकल्पाची निवड झाली.

रेडिओ इस्पॅलियर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर एटीएल टीकरींग लॅब कडून संपुर्ण भारता साठी घेत आहे. याच बरोबर अ‍ॅमिटी इंटरनॅशनल स्कूल, नोएडा, जिल्हा परिषद शाळा, भडलवाडी, महाराष्ट्र आणि रिव्हरसाइड स्कूल, अहमदाबाद, गुजरात यांच्याकडूनही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या उपक्रमासाठी भारता कडून किरण बीर सेठी आणि नंदिनी सूद यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव लॉकडॉऊनमध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सर्व शिक्षकांना रेडीओ साठी कसे व्हॉइस रेकॉर्ड करायचे याचे प्रशिक्षण दिले. रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच घरून मोबाईलवरून ऑडियो क्लिप्स बनवल्या. रेडिओचा प्रयोग यशस्वी झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना हा स्कूल रेडिओ उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत आदिवासी विकास महामंडळातर्फे स्कुल रेडिओ पोहोचविण्यात आला. युनिसेफ डी एफ सी चा हा पुरस्कार विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव आहे.

सचिन जोशी, इस्पॅलियर स्कूल, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या