Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमराठी साहित्य संमेलनासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला

मराठी साहित्य संमेलनासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 94th Marathi Literary Convention तमाम नागरिकांना निमंत्रण असून प्रवेश Entry खुला आहे. त्यासाठी स्वतंत्र पास, तिकीट अथवा तत्सम बाबीची कोणतीही गरज असणार नाही.

- Advertisement -

मात्र करोनाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध जारी केले आहेत, जसे लसीकरण झालेले असणे आणि मास्कचा वापर करणे याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. या संमेलनासाठी नाशिकच्या विविध ठिकाणाहून तीनही दिवस बसेसची व्यवस्था केलेली आहे.

या बसेस सकाळी 8 वाजेपासून सुटणार असून त्या साधारण दर 15 मिनीटांनी उपलब्ध होतील.काही प्रतिनिधी संमेलन स्थळी येऊन ऐनवेळेस प्रतिनिधी शुल्क भरु शकतात. त्यांना असे शुल्क तेथे भरता येईल. बाहेर गावाहून काही प्रतिनिधींना निवासाची व भोजनाची व्यवस्था नको आहे त्यांनाअसे प्रतिनिधी शुल्क भरावे लागणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या