Friday, May 10, 2024
Homeनाशिकइंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील शेकडो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’च्या दुसर्‍या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून इंदिरानगर आणि परिसरातील नागरिकांनी ‘वीकएण्ड’ चा पुरेपूर आनंद घेतला.

- Advertisement -

‘देशदूत’ आयोजित तसेच क्रीश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रायोजित व सहप्रयोजक रोहन एंटरप्राइजेस असलेल्या ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो 2024’ प्रदर्शनामध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. दुपारपासून गर्दीचा ओघ रात्री 9 पर्यंत सुरू होता.

स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. इंदिरानगर परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष मसाईट व्हिजिटफची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक क्रीश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स हे आहेत. तर सहप्रयोजक रोहन एंटरप्राइजेस प्रोमोटर्स अँड बिल्डर्स आहेत. फायनान्स पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र तर, पर्यावरणीय पार्टनर पपायाज् नर्सरी हे आहेत. आज रविवारी प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मान्यवरांची भेट
मा. नगरसेवक अ‍ॅ‍ॅड शाम बडोदे, शिवसेना ठाकरे गटाचे सागर देशमुख, गणेश स्पोर्ट्सचे संचालक निशांत जाधव आदी मान्यवरांनी एक्स्पोला हजेरी लावत विकासकांच्या स्टॉलला भेट दिली व माहिती जाणून घेतली. त्यांचे स्वागत जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, व्यवस्थापक मिलिंद वैद्य, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, ‘देशदूत’चे वार्ताहर किशोर चौधरी यांनी केले.

स्टॉलधारकांनी केले ‘देशदूत’चे कौतुक
अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले. एक्स्पो पासून अगदी हाकेच्या अंतरावर अनेक सहभागी बांधकाम व्यावसायिकांची साईट सुरू आहे त्यामुळे त्वरित साईट व्हिजिटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. भेट देणार्‍या ग्राहकांना आपल्या बजेटमध्ये असलेले व दर्जेदार प्रकल्प खूप आवडले असून, अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदविल्याचेही स्टॉलधारक म्हणाले. ‘देशदूत’ने आम्हाला ग्राहकांपर्यंत पोहचण्याची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
क्रीश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, रोहन एंटरप्राइजेस प्रोमोटर्स अँड बिल्डर्स, ललित रुंगटा ग्रुप, सुविक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आनंद ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अथर्व बिल्डकॉन, आकार बिल्डर्स,डीएसजे ग्रुप, एलिका डेव्हलपर्स, हरी ओम ग्रुप, सुर्या प्रॉपर्टीज, अर्बन साईट्स, आशापुरी कन्स्ट्रक्शनस, वास्तू बिल्डकॉन, युनिक सोलर सिस्टीम

- Advertisment -

ताज्या बातम्या