Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत

दहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

अलंगुण ( Alangun) येथे गेल्या काही दिवसांपुर्वी अतिवृष्टी( Heavy Rain ) झाल्यान वीज वितरण व्यवस्था (Power Supply )पुरती कोलमडली होती. आठ ते दहा विजेचे खांब कोसळले होते. वीज तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता.या घटनेला दहा दिवस लोटले तरी वीज वितरण कंपनी मार्फत गावात अद्यापही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

- Advertisement -

गावाच्या आसपास दाट जंगल असल्याने श्वापदे, वन्यजीव यापासून नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. वीज नसल्याने पीठाच्या गिरणी बंद आहेत. त्यामुळे रोजच जेवणात भात शिजवावा लागत आहे. मोबाईल, बॅटरी, दूरदर्शन संच बंद असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

उंबरठाण येथील फिडर वरुन निम्या गावात तात्पुरत्या स्वरुपात वीज जोडणी दिली असली तरी लोड असल्याने वारंवार वीज गायब होते. वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने या पाड्यावरील आश्रम शाळेत निवासी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने सर्पदंश, विंचूदंश, वन्यजीव यांची भीती वाटत आहे. तरी वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बंधार्‍यांचा सांडवा फुटल्याने महापुरात आठ ते दहा विजेचे खांब कोसळले होते. आज दहा दिवस झाले तरी अद्यापही खांब उभे केलेले नाहीत. वीज नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. साधे भ्रमणध्वनी रिचार्ज करण्यासाठी दुसर्‍या गावात जावे लागत आहे.पीठ गिरणी बंद असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील नियोजन पूर्णपणे बिघडले आहे. वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने तात्काळ सुरु करावा.

वसंत बागुल, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -

ताज्या बातम्या