Thursday, April 25, 2024
Homeनगरनिवडणूक खर्च सादर करण्यास 6 डिसेंबरची ‘डेडलाईन’

निवडणूक खर्च सादर करण्यास 6 डिसेंबरची ‘डेडलाईन’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम नुकत्याच पूर्ण झाला आहे. यात काही ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झालेल्या असून 178 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्षात निवडणूक झाली. या निवडणुकीत लढवणारे उमेदवार यांना निवडणुकीचा खर्च सादर करण्यास एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. येत्या 6 डिसेंबरपर्यंत खर्च सादर न करणार्‍या विजयी आणि पराभूत उमदेवार यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांनी निवडणूक लढवली असून मतदानाची प्रक्रिया आणि मतमोजणी होवून आता निकाल लागला आहे. दरम्यान, निवडणूक झाल्यानंतर आता जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक लढवणारे आणि विजयी- पराभूत उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या खर्चाचा हिशोब मागितला आहे.

निवडणूक लढवणार्‍या सर्व उमेदवारांनी विहीत नमुन्यात निवडणूक काळात झालेला खर्चाचा हिशोब निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे. यात निवडून आलेल्या सदस्यांनी हा खर्च सादर न केल्यास त्यांच्या पदावर गंडांतर असून पराभूत उमेदवारांनी खर्च सादर न केल्यास त्यांना पुढील वेळस निवडणूक लढवण्यास अडचण येणार आहे. यामुळे नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्व उमेदवारांना आपला निवडणुकीचा खर्च विहीत नमुन्यांत सादर करावा लागणार आहे. यासाठी 6 डिसेंबरही अखेरची मुदत राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या