Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शाईफेक; शिंदे ठाकरे वाद विकोपाला

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शाईफेक; शिंदे ठाकरे वाद विकोपाला

नाशिक | Nashik

राज्यातील राजकारणात शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडली आहे. शिवसेना शिंदेंची की, ठाकरेंची असा प्रश्न उपस्थित राहिला असतानाच आता शिंदे गटाला पसंती मिळू लागली आहे. अशातच आता ठिकठिकाणी शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी होत आहे. काल (दि २३) रोजी नाशिक शहरात (Nashik City) काही ठिकाणी पोस्टर लागलेले होते. या पोस्टरवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) व आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या छायाचित्रांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन देणारा आशय लिहिण्यात आला होता….

- Advertisement -

सेनेच्या सर्वात मोठ्या बंडात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे कुठे? आज समजले लोकेशन

दरम्यान, उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांच्या बाजूने असलेल्या शिवसैनिकांनी आज (दि २४) रोजी आक्रमक पावित्रा घेत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या छायाचित्रावर शाईफेक केली. शाईफेकीची वार्ता पोलिसांना समजताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा; उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना थेट आव्हान

मुंबईपुरता (Mumbai) मर्यादित असलेला विषय आता जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. तसेच मुंबईसह इतर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून समर्थन आणि विरोध केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या