Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदिलासादायक ! नाशिक विभागातुन आठ लाख ४८ हजार २९९ रुग्ण करोनामुक्त

दिलासादायक ! नाशिक विभागातुन आठ लाख ४८ हजार २९९ रुग्ण करोनामुक्त

नाशिक | Nashik

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत 8 लाख 78 हजार 732 रुग्णांपैकी 8 लाख 48 हजार 299 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत 17 हजार 972 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 12 हजार 425 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53 टक्के आहे, तर मृत्युदर 1.41 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 39 लाख 87 हजार 804 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 8 लाख 78 हजार 732 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 88 हजार 561 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 76 हजार 896 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 हजार 748 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के इतके आहे. आजपर्यंत 4 हजार 917 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.26 टक्के आहे .

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.10 टक्के

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 67 हजार 085 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 लाख 56 हजार 675 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 हजार 967 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.10 टक्के इतका आहे. आजपर्यंत 3 हजार 443 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.28 टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.25 टक्के

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 42 हजार 260 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 41 हजार 100 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 494 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.25 टक्के इतके आहे. आजपर्यंत 666 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.57 टक्के आहे.

जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के

जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 735 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 34 हजार 768 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 3 हजार 415 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के इतका आहे. आजपर्यंत 2 हजार 550 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.81 टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 91 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 38 हजार 860 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 348 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के इतके आहे. आजपर्यंत 849 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.11 टक्के आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या