Thursday, April 25, 2024
Homeनगरईद ए मिलाद मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारली

ईद ए मिलाद मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारली. यामुळे शहरातील मुस्लिम समाजाच्या पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त करत शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

- Advertisement -

संगमनेर शहरात दरवर्षी ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही मिरवणूक निघू शकली नव्हती. शासनाने सर्वच खुले केल्याने ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली होती.

या सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. करोनामुळे मिरवणुकीस परवानगी देता येणार नाही असे अधिकार्‍यांनी सांगितले. उपस्थित मुस्लिम समाजाच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. चहा पाणी न घेता व रजिस्टरवर कुठलीही नोंद न करता या पदाधिकार्‍यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. या बैठकीस माजी नगरसेवक शरीफ शेख, नगरसेवक वसीम शेख, रिजवान शेख, शौकत जहागिरदार, गफार भाई शेख, मुजीब लाला शेख, नजीर भाई फिटर, रहमान शेख, इसाक शेख मौलाना, लतिफ जमील सय्यद आदी उपस्थित होते.

राज्यामध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत. असे असतानाही आमच्या मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारून दुजाभाव दाखवला असल्याचा आरोप शरीफ शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या