Thursday, May 2, 2024
Homeजळगावशाळांकडून सक्तीची फी वसुलीकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा

शाळांकडून सक्तीची फी वसुलीकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून सन 2020 यावर्षी इयत्ता पाच ते 9वी पर्यत ऑनलाईन शिक्षण सुरु होते.

- Advertisement -

यावर्षी विद्यार्थ्यांचा निकाल ऑफलाईन की ऑनलाईन द्यावा याविषयी शिक्षण विभागाच्या कोणत्याही स्पष्ट सूचना नसताना जळगावातील एका विद्यालयाने निकाल जाहीर केला असून या निकालाबाबत शिक्षण विभागही संभ्रमात पडले आहे.

शिक्षण विभाग मोठा की संस्था याविषयी वादाला तोंड फुटले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी फी भरलेली नसल्याने त्यांचे निकाल रोखण्यात आला असल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.

कोरोना काळात सक्तीने फी वसुली करु नये, अशा सूचना शाळांना दिलेल्या आहे. फी साठी निकाल रोखणार्‍या शाळांविषयी लेखी तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.

सतीश चौधरी,गटशिक्षणाधिकारी जि.प.जळगाव

कोरोनाच्या कठीण काळात जिल्ह्यात शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 ते 9 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरु होते.

मात्र, शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली करण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शिक्षणसंस्थांची मुजोरी वाढल्याचा प्रकारही वर्षभरात अजूनमधून घडले आहेत.

करोनामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षणात सरले असून या शैक्षणिक सत्राचा निकाला जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नसतानाही जळगावातील शानबाग विद्यालयाने ऑफलाईन निकाल जाहीर करुन काही विद्यार्थ्यांना निकालपत्रही वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे.

मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे. त्यांचे निकाल रोखण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात तक्रार रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे भ्रमणध्वनीवरुन तक्रार केली आहे.

मात्र, शिक्षण विभागाने संस्थाचालकांना समज देण्याऐवजी या प्रकाराकडे कानाडोळा केला आहे.दरम्यान, या प्रकाराविषयी शानबाग विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक टेंमरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या