Friday, April 26, 2024
Homeनाशिकखा. संजय राऊतांवर ईडीची कारवाई; मालेगावला शिवसेनेकडून निषेध

खा. संजय राऊतांवर ईडीची कारवाई; मालेगावला शिवसेनेकडून निषेध

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

शिवसेना नेते खा. संजय राऊत ( Shivsena Leader MP Sanjay Raut ) यांच्यावर आज इडी ( ED )तर्फे ताब्यात घेण्यात आलेल्या कारवाईचा शहर शिवसेनेतर्फे निषेध करत मोसम पुलावरील म गांधी पुतळ्याजवळ घोषणा देत निदर्शने करण्यात आली सरकारने राजकीय देशातून सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप संतप्त शिवसैनिकांनी यावेळी बोलताना केला.

- Advertisement -

आज दुपारी मुंबई येथे इडीतर्फे( ED ) खा. संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्तप्रसारीत होताच येथील शिवसैनिक संतप्त झाले मोसम पुलावरील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद का राऊत यांच्या कारवाईचा निषेध असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामा मिस्तरी महानगर प्रमुख राजाराम जाधव ज्येष्ठ नेते प्रमोद शुक्ला कैलास तिसगे जितेंद्र देसले दिनेश पाटील आधी पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर करत खा राऊत यांच्यावर सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या मराठी माणसाच्या अवमानाचा देखील शिवसैनिकांतर्फे निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात भरत पाटील अनिल पवार दत्तू गवळी क्रांती पाटील अजय जगताप गंगाधर जाधव नंदू पाटील यशवंत मोरकर विजय गवळी नरेंद्र वसईकर बापू शिंदे भीमा गवळी अमोल चौधरी संदीप अभोंकर राहुल जगताप उद्धव पवार स्वप्निल श्रीवास्तव किशोर जाधव नाना शिंदे सागर पवार प्रदीप प्रजापत सुधा जोशी अर्जुन भाटी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या