Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी

४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी

पुणे | Pune

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) (Directorate of Enforcement) आता आपला मोर्चा पुण्याकडे वळवत जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या (document) आधारे कर्ज (loan) वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी (Amar Mulchandani) यांच्याकडे छापेमारी करण्यात आली.

- Advertisement -

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri chinchwad) सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे टाकण्यात आलेल्या या छाप्यांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी पुरावे शोधण्यात येतील.

नाशिकचे आणखी 14 बडे नेते शिंदे गटाच्या वाटेवर

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांनाही कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही. यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले.

सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

भुसावळमध्ये भूकंपाचे धक्के, परिसरात भीतीचे वातावरण

अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने आधीच प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून असल्याने या छापेमारीने त्या ठेवीदारांना काही तरी दिलासा मिळेल का याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या