एैन दिवाळीत लागणार ग्रहण

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

यावर्षीच दुसरे व अखेरचे सूर्यग्रहण (solar eclipse) आज दिसणार आहे. सत्तावीस वर्षांनंतर एैन दिवाळीच्या (diwali) दिवसांत ग्रहण आले आहे.

खग्रास सूर्यग्रहण (Khagras solar eclipse) हा खगोलीय आविष्कार अनुभवण्याची संधी या निमीत्ताने खगोलप्रेमींना मिळणार आहे. ग्रहण सुटण्या आधीच सायंंंंकाळी 6:08 वाजता सूर्यास्त होईल. तसेच, ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसणार आहे.

गेल्या एप्रिल मध्ये सूर्यग्रहण आले होते. आजचे दुसरे ग्रहन आकाश निरंभ्र मोकळे राहिल्यास खगोलप्रेमींना खग्रास सूर्यग्रहण (solar eclipse) अनुभवण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीच्याा (diwali) दरम्यान ग्रहण असले तरी दिवाळ सणावर त्याचा काहीही परीणाम होणार नसल्याचे पुरोहीत सांगत आहे. दिवाळीच्या पुढील दिवशी गोवर्धन पूजा (Govardhan Puja) केली जाते. परंतु यावर्षी सूर्यग्रहणामुळे 26 ऑक्टोबरला गोवर्धन पूजा केली जाणार आहे.

खगोलप्रेमींनी सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी बघण्याचे टाळावे. अन्यथा डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. सुर्यग्रहन पाहण्यासाठी वेगळ्या स्वरूपाचा चष्मा, गॉगलचा (goggles) आधार घेत या खगोलीय अविष्काराची अनुभूती घेता येईल. ग्रहण काळात काही र काही धार्मीक विधी (religious rituals) पालन करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.

ग्राहन काळात सुतक पाळले जाते. सूर्यग्रहण दुपारी चारच्या सुमारास दिसणार असल तरी बारा तास अगोदर पहाटे चारपासूनपासुनच ग्रहानाचे वेध लागणार आहे. छाया पहाटे 4 वाजून 49 मिनिटे, स्पर्श दुपारी 4 पुसुन होणार आहे .ग्रहण मध्य सायंकाळी 5.43 वाजता होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *