Saturday, April 27, 2024
Homeजळगावखा. खडसे, स्मिता वाघ, संतोष चौधरींसह १३७ अर्ज अवैध

खा. खडसे, स्मिता वाघ, संतोष चौधरींसह १३७ अर्ज अवैध

जळगाव / jalgaon

जिल्हा बँकेच्या (District Bank) निवडणुकीसाठी (Election) जिल्हाभरातील मातब्बर उमेदवारांसह २७९ उमेदवारांनी अर्ज (Candidates apply)दाखल केले होते. छाननीअंती खा. रक्षा खडसे, माजी आ. स्मिता वाघ, संतोष चौधरी यांच्यासह १३७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर १४२ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई (Returning Officer Santosh Bidwai) यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरु झाली असून जिल्हाभरातील आमदार खासदारांसह सर्वच पक्षातील मात्तबर नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी २७९ अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. दुपारपर्यंत अर्जांची छाननी झाल्यानंतर काही उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी तात्काळ सुनावणी घेत हे अर्ज निकाली काढले. दरम्यान, आज छाननी प्रक्रियेतनंतरची वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कागदपत्रांची पुर्तता नसल्याचे कारण देत खा. खडसेंचा अर्ज अवैध

मुक्ताईनगर विका सोसायटी मतदार संघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रीया पार पडल्यानंतर त्यांच्या अर्जासोबत असलेल्या कागदपत्रांची पुर्तता नसल्याचे सांगत त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे. यासोबतच भाजपच्या माजी आ. स्मिता वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आ. संतोष चौधरी, जि. प. माजी शिक्षणसभापती सुरेश धनके, जि. प. सदस्या माधुरी अत्तरदे यांचा अर्ज देखील अवैध ठरविण्यात आला आहे.

आ. अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चित

अमळनेर विका सोसायटी मतदार संघातून भाजपकडून माजी आ. स्मिता वाघ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आ. अनिल भाईदास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत माजी आ. स्मिता वाघ यांचा अवैध ठरल्यामुळे आ. अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. तर महिला राखीव मतदार संघातून माजी आ. स्मिता वाघ यांचा अर्ज वैध ठरल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.

निवडणुकीपुर्वीच भाजपला धक्का

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीमध्ये भाजपकडून १७ जागांवर आमदार खासदारांसह अनेक मात्तबर नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील खा. रक्षा खडसे, माजी आ. स्मिता वाघ, सुरेश धनके, जि. प. सदस्या माधुरी अत्तरे या मातब्बर उमेदवारांचा अर्ज अवैध ठरल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या