Thursday, April 25, 2024
Homeनगरद्वारकामाई व चावडीत बसविले मकराना मार्बल

द्वारकामाई व चावडीत बसविले मकराना मार्बल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांचे सलग 60 वर्षे वास्तव्य असणार्‍या द्वारकामाई व चावडीत दानशूर साईभक्त के. व्ही. रमणी यांच्या देणगीतून

- Advertisement -

नूतन मकराना मार्बल बसविण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

श्री. बगाटे म्हणाले, श्रींचे द्वारकामाईतील धुनीजवळील मुख्य भाग, ओटा व पायर्‍या यांचे जुने झालेले मार्बल, फ्लोरींग तसेच चावडीचा मुख्य भाग व वर्‍हांडा येथील जुने झालेले तंदुर स्टोन फ्लोरींग काढून त्याठिकाणी नविन प्युअर व्हाईट मकराना मार्बलचे फ्लोरींग बसविणे व द्वारकामाई सभामंडपातील मार्बल फ्लोरींगला पॉलीश करणे ही कामे साईभक्त के. व्ही. रमणी, चेन्नई यांचेकडून देणगी दाखल करून घेण्यास तदर्थ समितीने मान्यता दिली होती.

त्यानुसार देणगीदार साईभक्त के. व्ही. रमणी व त्यांचे बंधू भास्करण यांनी मकराना मार्बल जयपूर नजिक मकराना येथून खरेदी करून संस्थानला देणगी स्वरुपात दिले. सदरचे मार्बल जयपूर येथील साईभक्त विवेक चुर्तवेदी यांनी स्वखर्चाने शिर्डी येथे पोहच केले. तसेच याकामी जयपूर येथील 3 कुशल कारागीर आवश्यक साहित्यांसह शिर्डी येथे पाठविले.

तसेच याकामी आवश्यक असणारे इतर सर्व साहित्यही त्यांनी देणगी स्वरुपात दिले. सदरच्या मार्बलला पॉलीश करण्यासाठी नाशिक येथील कारागीरांची व्यवस्थाही केली. या कामाकरिता सुमारे 7 लाख रुपये श्री. चर्तुवेदी यांनी देणगी स्वरुपात खर्च केले असल्याचे श्री. बगाटे यांनी सांगितले.

25 ऑगस्ट 2020 रोजी मार्बल बसविण्याचे काम पूर्ण झाले. सदरचे काम पूर्ण होण्यासाठी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, उपअभियंता संजय जोरी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या