Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककर्तव्य हे सर्वप्रथम त्यानंतर कुटुंब : पोलीस उपायुक्त खरात

कर्तव्य हे सर्वप्रथम त्यानंतर कुटुंब : पोलीस उपायुक्त खरात

नवीन नाशिक | New Nashik

मी एक पोलिस अधिकारी जरी असलो तरी एका मुलाचा बाप आहे. हे असताना देखील मी माझे कर्तव्य विसरलो नसल्याने मी माझ्या कुटुंबीयांच्या बद्दल माझ्या खात्याला किंवा अन्य कोणालाही काही सांगितले नाही. असे वक्तव्य पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी केले….

- Advertisement -

नाशिक परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विजय खरात यांचा चिरंजीव क्षितिज विजय खरात हा युक्रेनमध्ये मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे.

रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्बगोळे डागले जात आहेत. प्रचंड भयावह परिस्थिती निर्माण झाली. मात्र, बापाच्या काळजामध्ये प्रेम असतं हे उपायुक्त विजय खरात यांनी कुणालाही जाणवू दिले नाही.

शहरामध्ये सुरू असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्या खात्यातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देत कर्तव्य बजावत राहिले. पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी उपायुक्त खरात यांचे स्वागत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या