Friday, April 26, 2024
Homeनाशिकयेवला तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

येवला तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

येवला |प्रतिनिधी

पावसाळ्याचे चार महिने संपत आले असून येवला तालुक्यात अद्यापपर्यंत नदी,नाले दुथडी भरुन वाहिले नाही. कधी तरी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे प्रारंभीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरलेली सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांची वाढ न होताच पावसाअभावी ते जळून गेले. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तरी काहीच उपयोग झाला नाही.बी,बीयाणे,खतांसाठी केलेला खर्च वाया गेला.

- Advertisement -

त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शासनाने १ रुपयात पीकविमा काढलेला आहे.जळालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करुन लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,विजेचा प्रश्‍न गंभीर झाला असून शेतीसाठी पूर्णवेळ विज देण्यात यावी,नागरिकांसह जनावरांना पिण्याचे पाणी,जनावरांना चारा उपलब्ध करणे अत्यंत कठिण होऊन बसले आहे.

याबाबतीत राज्य शासनाने गांभिर्यपूर्वक लक्ष देऊन येवला तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन अमृताताई पवार यांच्यासह पप्पूशेठ सस्कर,संपत कदम,बाळासाहेब कुऱ्हे,संतोष केंद्रे,रासुले पाटील,अरुण आव्हाड,नानाभाऊ लहरे,छगन दिवटे,तरण गुजराथी,मनोज दिवटे,राजु परदेशी,दत्ता सानप,कृष्णा कव्हात आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत येवला तहसिलदार आबा महाजन यांना देण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या