Saturday, April 27, 2024
Homeराजकीयगॉडफादरशिवाय घोटाळा शक्य नाही

गॉडफादरशिवाय घोटाळा शक्य नाही

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर गाजत असलेला ठेवीदारांच्या संदर्भातील प्रकरणाची पाळेमुळे खोलवर असून चौकशीअंती सर्व काही बाहेर येईलच.

- Advertisement -

परंतु, इतका मोठा भ्रष्टाचार करणार्‍या झंवर नामक व्यक्ती जो कोणी आहे; त्याच्या पाठीमागे राजकीय पाठबळ गॉडफादर असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असे माजी मंत्री महाजनांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या घणाघाती आरोप माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात ठेवीदारांचा प्रश्न गेल्या चार पाच वर्षांपासून गाजत आहे. यातील अनेक ठेवीदार मयत झालेले काहींच्या मुला-मुलींची लग्न वेळेवर ठेवींचा परतावा न मिळाल्यामुळे मोडली आहेत.

अशा सर्वसामान्यांच्या जमापुंजीतून अनेकांनी मालमत्ता विकत घेतल्या आहेत. युती शासनाच्या काळात या संदर्भातील चौकशी दडपून ठेवण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या चौकशीला गती दिली आहे.

चौकशीअंती सर्वकाही सत्य उघड होईलच, यातील थकबाकीदार कोणीही असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई ही होईलच, असेही त्यांनी नाव न घेता महाजनांचे नाव न घेता इशारा दिला.

जिल्हा व महानगर काँग्रेस पार्टीतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पक्षाचे झेंडावंदन तसेच परिसर स्वच्छता, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे.

यासह मेहरुण येथे ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात येणार असून तालुकास्तरावर शैक्षणिक सामाजिक आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी दिली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, दिलीप वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवा जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य रवींद्र पाटील, स्वप्निल नेमाडे, संजय पवार, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, राजेश पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, मजहर पठाण, डॉ.रिजवान खाटीक, अकिल पटेल, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मंगला पाटील, रिता बाविस्कर, कमल पाटील, जयश्री पाटील, जुलेखा तडवी, ममता तडवी, शकिला तडवी, रोहन सोनवणे, कुणाल पवार, मोहन पाटील, संजय चव्हाण व प्रसिद्धी प्रमुख इनामदार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या