Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. नितीन राऊत यांनी घेतली उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट; प्रधान सचिवांना दिले तातडीने...

डॉ. नितीन राऊत यांनी घेतली उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट; प्रधान सचिवांना दिले तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश

मुंबई :

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भामेर येथील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची व आझाद मैदानात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानभवन परिसरात भेट घेतली. या शेतकऱ्यांनी डॉ. नितीन राऊत यांना निवेदन दिले, त्यावर संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी माहिती सादर करण्याचे आदेश डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव यांना दिले आहेत.

- Advertisement -

साक्री तालुक्यातील भामेर येथील आदिवासी शेतकऱ्यांची जमीनी बेकायदेशीर पणे हस्तगत करून त्यावर मे. सर्जन रियालिटीज अहमदाबाद या कंपनीने प्रोजेक्ट उभारला आहे, असा आरोप प्रहार शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. आदिवासींच्या जमीन विकत घेता येत नाही, असे असताना भामेर येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा, कंपनीने नेमलेल्या व्यक्तींची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समाज संशोधन आणि सर्वांगीण विकास संस्थेनेही 24 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासाच्या काळात अखंड आणि पूर्ण दाबाने विनामूल्य विद्युत पुरवठा करावा, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना रोज 24 तास मोफत वीजपुरवठा करावा तसेच वीजबिल थकबाकी पोटी विद्युत पुरवठा खंडित करु नये अशा मागणीचे निवेदन सदर संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय रघुनाथ राऊत यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिले. डॉ. नितीन राऊत यांनी याप्रकरणी तात्काळ प्रधान सचिव ऊर्जा यांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या