Wednesday, April 24, 2024
Homeनगरभिंगारमध्येही राडा

भिंगारमध्येही राडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरूवारी रात्री भिंगार परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजाच्या गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी 10 ते 15 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात करत एकाला अटक केली आहे.

- Advertisement -

भिंगार येथे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हुसेन रहीमान खान (वय 49 रा. मोमीन गल्ली, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा फैजल खान हा मिरवणूक बघत असताना सुनिल सोनवणे, शिवा भागानगरे, आशिष क्षेत्रे, आकाश क्षेत्रे (सर्व रा. भिंगार) व त्यांच्यासोबतच्या चार ते पाच साथीदारांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे. तसेच मारहाणीत मुक्तार सय्यद याच्याही डोक्याला मार लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनील सोनवणे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी तपास करत आहेत.

दुसरी फिर्याद सुनील सोनवणे यांनी दिली आहे. मिरवणुकीमध्ये नाचत असताना सात ते आठ जण झेंडे घेऊन मिरवणुकीत आले. त्यांना समजावून सांगताना त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शादाब (पूर्ण नाव माहीत नाही, रा. आलमगीर), मुख्तार नसीर शेख, फैसल हुसेन शेख, तौसिफ शेख (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. मोमीन गल्ली, भिंगार), अरबाज कुरेशी (रा. सदर बाजार, भिंगार), रबाज (मुन्ना भंगारवाला यांचा मुलगा), निसार कसाई (रा. कंजारवाडा, भिंगार) यांच्या विरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या