Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोलेने करोना बाधितांचे द्वीशतक ओलांडले

अकोलेने करोना बाधितांचे द्वीशतक ओलांडले

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिवसभरात अकोले तालुक्यातील नऊ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांच्या संख्येने दुसरे शतक ओलांडले आहे.

- Advertisement -

काल शुक्रवारी 19 रुग्ण बाधित आढळल्यानंतर आज शनिवारी सकाळी खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये 64 व्यक्तीच्या रॅपिड न्टीजन करोना टेस्ट घेण्यात आल्या. या टेस्ट मध्ये तालुक्यातील देवठाण येथील दोन व म्हाळादेवी येथील दोन अशी चार व्यक्तींचा अहवाल करोना पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये देवठाण येथील 22 वर्षीय दोन तरुण तर म्हाळादेवी येथील 30 वर्षीय पुरुष व 03 वर्षीय बालकाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवीन नवलेवाडी एक 73 वर्षीय पुरुष, अगस्ती कारखाना रस्त्यावरील 30 वर्षीय तरुण,कोतुळ येथील 38 वर्षीय पुरुष व 22 वार्षिय तरुण व राजूर येथील 31 वर्षीय तरुण अशा पाच जणांचे रिपोर्ट शनिवारी सायंकाळी पॅाझिटीव्ह आले आहेत.त्यामुळे अकोले तालुक्यातील रुग्णाची संख्या 205 झाली आहे. त्यापैकी 152 व्यक्ती करोनामुक्त झाले तर 04 जण दगावले असून 49 व्यक्तीवर उपचार सुरू आहे.

दरम्यान राजूर येथील एका महाविद्यालयातील शिक्षकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजूर ग्रा पं च्या वतीने सुरक्षित त्यासंदर्भात दवंडी दवंडी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करोना मुक्त झालेले देवठाण गावात पुन्हा दोघा तरुणांच्या रूपाने करोनाने प्रवेश केला आहे.

दरम्यान धामणगाव आवारी वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार धामणगांव आवारी येथे एका 55 वर्ष वयाच्या इसमाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यास खानापूर येथील कोव्हीड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. संबंधित इसमास चार ते पाच दिवसा पासुन सर्दी खोकला त्रास जाणवत होता, त्याने गावातीलच एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत होता परंतु त्याला कोणताही फरक पडला नाही.

त्याचा संशय आल्याने स्थानिक करोना नियंत्रण कमेटीने त्यास कोविड सेंटरमध्ये नेवून स्वाब घेतला असता तो करोना पॅाझिटीव्ह आढळून आला. या इसमाचे घराशेजारील परिसर सील करण्यात आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीनी स्वतः होऊन होम क्कारंटाईन व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक कोव्हीड नियंत्रण कमेटीने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या