Thursday, April 25, 2024
HomeUncategorized'गुगल'कडून न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन यांना 'डूडल' सलाम

‘गुगल’कडून न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन यांना ‘डूडल’ सलाम

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुगल (Google) नेहमीच जगातील महत्वाच्या घटना, लोकप्रिय व्यक्तींची जन्मतिथी, स्मृतिदिन आपल्या doodle द्वारे जगासमोर मांडत असते. आज न्यूरोलॉजिस्ट (Neurologist) लुडविग गुटमन (Ludwig Guttmann) यांचा 122 वा जन्मदिन आहे. यासाठी गुगलने आपल्या डुडलवर (Doodle) एक आकर्षक डिझाईन तयार केले आहे. त्यात लुडविग गुटमन यांच्या कार्याची दाखल घेण्यात आली आहे. चला मग हे लुडविग गुटमन नक्की आहेत तरी कोण जाणून घेऊ…

- Advertisement -

लुडविग गुटमन यांचा जन्म 3 जुलै 1899 रोजी टोस्ट जर्मन साम्राज्य येथे झाला. सध्या हे शहर पोलंडमध्ये आहे. गुटमन 3 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब सिलेशियनमध्ये (Silesian) मध्ये स्थलांतरित झाले. येथूनच त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले.

1918 मध्ये त्यांनी University of Breslau येथून आपला मेडिकलचा अभ्यास सुरु केला. 1933 मध्ये ते एक न्यूरोसर्जन म्हणून काम करू लागले. याकाळात ते युनिवर्सिटीजमध्ये लेक्चरदेखील देऊ लागले.

त्यांनी इंग्लंडमध्ये अपंगांसाठी पॅरालिम्पिक गेम्स, स्पोर्टिंग इव्हेंट ‘स्टोक मॅंडेविले गेम्स’ (Stoke Mandeville Games) ची स्थापना केली. सध्या ही स्पर्धा ऑलिम्पिक (Olympics) एवढीच महत्वपूर्ण मानली जाते.

29 जुलै 1948 रोजी लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या दिवशीच स्टोक मॅंडेविले हॉस्पिटलमध्ये (Stoke Mandeville Hospital) युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले ‘स्टोक मॅंडेविले गेम्स’ आयोजित करण्यात आले होते.

यात सहभागी झालेल्यांना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती. व्हीलचेअर्सचा (Wheelchairs) वापर करून सर्वांनी या स्पर्धेत भाग घेतला. आपल्या रूग्णांना राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी गुटमन यांनी ‘पॅराप्लेजिक गेम्स’ (Paraplegic Games) हा शब्द वापरायला सुरुवात केली.

त्यानंतर हा ‘पॅरालंपिक खेळ’ (‘Paralympic Games’) म्हणून ओळखला जाऊ लागला. 1952 पर्यंत, 130 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी स्टोक मॅंडेविले गेम्समध्ये सहभाग नोंदवला होता. 1956 च्या स्टोक मॅंडेविले गेम्समध्ये, गुटमन यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ‘सर थॉमस फेर्नली चषक’ (Sir Thomas Fearnley Cup) देऊन सन्मानित केले.

1960 साली रोममध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक सोबतच ‘आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स’चे आयोजन करण्यात आले होते. ते नववे वार्षिक आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स म्हणून ओळखले जाते. त्यांनी 1961 मध्ये British Sports Association for the Disabled ची स्थापना केली. गुटमन यांची 18 मार्च 1980 रोजी निधन झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या