Wednesday, April 24, 2024
Homeनगरसेंद्रीय खताच्या वापराने जमिनीचे आरोग्य राखणे शक्य - डॉ. अनिल दुरगुडे

सेंद्रीय खताच्या वापराने जमिनीचे आरोग्य राखणे शक्य – डॉ. अनिल दुरगुडे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

जमिनीची आरोग्यपत्रिका तसेच मातीपरीक्षण अहवालानुसार जमिनीमधील उपलब्ध मुलद्रव्यांची कमतरता तपासून व जमिनीमध्ये सेंद्रीय खतांचा

- Advertisement -

वापर करून जमिनीचे आरोग्य चांगले राखता येईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी केले.

संगमनेर महाविद्यालयातील बी.व्होक. विभागाद्वारे जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड होते. यावेळी डॉ. मोरे एम. एस., डॉ.जयश्री कडू, प्रा.आश्विनी तांबे, प्रा.पुनम गुंजाळ आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.

डॉ.दुरगुडे म्हणाले, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार पीक व फळबाग नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच माती परीक्षणाद्वारे खत व्यवस्थापन केले तर उपलब्ध अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांमधून त्या अन्नद्रव्यांचा पिकांना पुरवठा केला जाऊ शकतो. तसेच मातीपरीक्षण करताना वेगवेगळ्या जमिनीमधील व वेगवेगळ्या पिकांसाठी मातीचा नमुना कसा घ्यावा? याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करावा तसेच शेतकर्‍यांनाही मार्गदर्शन करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रात्याक्षिक ज्ञान घेऊन आपली शेती सुधारण्याकडे जास्तीत जास्त भर द्यावा, असे आवाहन केले. वेबिनारमध्ये महाविद्यालयातील बी.व्होक. विभागातील प्राध्यापक व 74 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

प्रास्ताविक डॉ. जयश्री कडू यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा.पुनम गुंजाळ यांनी करून दिला. आभार प्रा.अश्विनी तांबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनसाठी डॉ.अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बी.व्होक. विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सहकारी तसेच विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या