Friday, April 26, 2024
Homeजळगावटीका करणार्‍यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करा

टीका करणार्‍यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ज्या प्रकारे राज्यात शिवसेनेवर (Shiv Sena) विरोधक (Opposition) तूटून पडत आहेत, ज्या प्रकारे शिवसेनेवर विरोधकांकडून कुरघोडी करण्याचे काम केले जात आहे अशा विरोधकांना उत्तर देऊन त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम (‘Correct’ program) करा अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील(Guardian Minister Gulabrao Patil) यांनी आज झालेल्या जिल्हा बैठकीत केल्या.

- Advertisement -

शिवसेनेची जिल्हा बैठक शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. यावेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मुंबईचे युवासेनेचे मिलिंद साटम, चंंद्रकांत शर्मा, हर्षल माने, आमदार किशोर पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा महानंदा पाटील, महिला महानगराध्यक्षा शोभा चौधरी यांच्यासह जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जि.प., पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेची खरी ओळख आणि ताकद म्हणजे शाखा होय. यामुळे प्रत्येक शाखेची पाटी ही गावाच्या वेशीवर सर्वांनी दिसेल अशा पध्दतीने लावणे आवश्यक आहे. यामुळे विरोधकांच्या दुष्प्रचाराला (propaganda of the opposition) योग्य उत्तर देता येणार असून यासोबत सरकारने केलेल्या कामगिरीच माहिती देखील जनतेपर्यंत परिणामकारक पध्दतीत पोहचवता येणार आहे.

शिवसैनिकांनी मजबूत बनावे आणि विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला. जिल्ह्यात 26 ते 29 मे दरम्यान शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyan) राबविण्यात येणार असून, या अभियानादरम्यान जिल्ह्यात शिवसेनेचे राज्य पातळीवरचे 20 हून अधिक नेते, खासदार, आमदार, मंत्री जिल्ह्यात दाखल होणार असून, तालुकानिहाय दौरे, बैठका व संघटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी या बैठकीत दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या