Tuesday, May 14, 2024
Homeनगरदिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची स्वदेशी मालाला पसंती

दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची स्वदेशी मालाला पसंती

राहाता | Rahata

दिवाळी सणाला चायनीजपेक्षा इंडियन विद्युत लाईट माळा, आकाश कंदील याला ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. दिवाळी सणानिमित्त राहाता बाजारपेठेत विविध प्रकारच्या इंडियन आकर्षक लाईट माळा, आकाश कंदील दाखल झाले आहेत. करोनामुळे नागरिकांची झालेले आर्थिक नुकसान, भारताच्या सीमेवर चीनकडून होणारी घुसखोरी, चीनकडून सातत्याने भारतावर होत असलेले हल्ले या सर्व गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भारतीय नागरिकांमध्ये जागृतता निर्माण होत असल्याने चिनी वस्तू खरेदी करण्यासाठी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

दीपावली व इतर दैनंदिन वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी स्वदेशी माल खरेदीकडे भर दिली आहे. चिनी वस्तू म्हणजे फक्त आकर्षक दिसणारी व कमी किमतीत मिळणारी टिकाऊ नसली तरी किंमत कमी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चायनीज माल खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत होते. इंडियन वस्तू दिसायला आकर्षक नाही परंतु मजबूत असल्यामुळे चायना वस्तूपेक्षा दराने जास्त आहेत. त्यामुळे अनेक भारतीय ग्राहकांचा भारतीय वस्तू खरेदीकडे कल कमी झाला होता. परिणामी देशाच्या अर्थचक्रावर मोठा परिणाम दिसू लागला. चायना मालाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भारतातील नागरिकांना निर्मिती केलेल्या वस्तूला कमी मागणी होत असल्याने भारत देशात रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवू लागला. चिनी वस्तूची भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने चीनचे अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली.

परंतु गेल्या दोन वर्षांपासून चीनमुळे भारतीय नागरिकांना करोनामुळे झाला त्रास, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम कोविडमुळे लाखो नागरिकांचा झालेला मृत्यू. या सर्व गोष्टींमुळे भारतीय नागरिकांनी सध्या चिनी वस्तू खरेदीकडे दुर्लक्ष केल्याने स्वदेशी वस्तूची मागणी वाढली. त्यामुळे भारतातील नागरिकांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होणार आहे व अर्थकारणाला नक्कीच चालना मिळू शकेल.

स्वदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली तर भारतीय नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल परिणामी करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल. चिनी वस्तू ‘युज अँड थ्रो’ आहे. भारत हा कृषिप्रधान देश समजला जातो. भारतीय नागरिक स्वदेशी वस्तू खरेदीसाठी प्राधान्य दिले तर देशाचे अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या