Saturday, April 27, 2024
Homeनाशिकविभागीय कार्यालय गोडाऊन!

विभागीय कार्यालय गोडाऊन!

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

सध्या नवीन नाशकात एलईडी फिटिंगचे काम सुरू आहे. मात्र जुन्या फिटिंग काढून विभागीय कार्यालयाच्या आवारातच ठेवल्याने कार्यालयाला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

संपूर्ण भारतात मनपाची सुंदर इमारत म्हणून राजीव गांधी भवनच्या इमारतीची चर्चा झाली होती. याच धर्तीवर मिनी इमारत नवीन नाशिक विभागीय कार्यालयाची बांधण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन नाशिक परिसरात पथदीपांच्या जुन्या फिटिंग काढून त्याजागी नवीन एलईडी फिटिंग बसवण्याचे काम ठेकेदारामार्फत प्रगतिपथावर आहे.

मात्र नवीन फिटिंग बसवण्यात आल्यानंतर जुन्या फिटिंग काढून नवीन नाशिक विभागीय कार्यालयात विद्युत विभागाच्या कार्यालयाबाहेर ठेवण्यात आल्याने या ठिकाणाला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वास्तविक पाहता मनपाकडे नवीन नाशिक परिसरात इतरत्र जागा असतानादेखील सदर जुन्या फिटिंग या कार्यालयात का ठेवण्यात येत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत नवीन नाशिक विभागीय कार्यालय अग्रेसर आहे. मात्र जुन्या फिटिंग जमा करून कार्यालयाला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाल्याने सदर कार्यालयाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने त्यांच्या इतरत्र असलेल्या मालमत्तेमध्ये सदर जुन्या फिटिंग ठेवण्यात येऊन विभागीय कार्यालय गोडाऊनमुक्त करावे, अशी मागणी नवीन नाशिककरांमधून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या