Friday, April 26, 2024
Homeनाशिकगोदा प्रदूषणाची विभागीय आयुक्त व निरी करणार पाहणी

गोदा प्रदूषणाची विभागीय आयुक्त व निरी करणार पाहणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

गोदावरीच्या निळ्यापूर रेषेत सिमेंट क्राॅकिटचे काम करण्यास मनाई असताना त्याचे उल्लंघन होत असून याप्रकरणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व निरिचे पथक शुक्रवारी (दि.१९) रामकुंड व परिसराची येथे पाहणी करणार आहेत.

- Advertisement -

नंदिनी नदीत मोठ्या प्रमाणात सिमेंट क्राॅकिटिकरणाच्या कामाविरोधात गोदाप्रेमी न्यायालयात गेले होते. यावेळी न्यायालयाने नदीपात्रात सिंमेट क्राॅकिटचे काम करण्यास सक्त मनाई केली होती. दगडी भिंत (गॅब्रियलपध्दतिने) काम करण्यास परवानगी देण्यात आली होती.

त्यावर वाॅच ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निरी, गोदाप्रेमी यांची समिती गठित करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोदावरीसह इतर नदीपात्रामध्ये मोठया प्रमाणात सिमेंट क्राॅकिटची कामे करण्यात आली.

त्यामुळे गोदेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत होळकर पुलाखाली सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मोठया प्रमाणात निळ्या पूर रेषेत सिमेंट क्राॅकिटची कामे होत असून न्यायालयाच्या आदेशाचे सरार्स उल्लंघन होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी विभागीय आयुक्तांसह निरिचे पथक व गोदाप्रेमी या रामकुंड व आजूबाजूच्या परिसराला भेट देऊन पाहणी करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या