Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाजिल्हा क्रिकेट संघटनेचा निवडणूक निकाल जाहीर

जिल्हा क्रिकेट संघटनेचा निवडणूक निकाल जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची ( Nashik District Cricket Association ) सन 2022 ते 2025 या कालावधीसाठीची कार्यकारिणी सदस्यपदाची निवडणूक( election ) शनिवारी (दि. 9) सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान पार पडली. सायंकाळीच साडेपाच वाजेनंतर त्याच ठिकाणी मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. खेळाडू पॅनलचे ( Kheladu Panel )दहा उमेदवार विरोधात एकच उमेदवार अशी लढत होती.

- Advertisement -

या निवडणुकीत धनपाल(विनोद) शाह (चेअरमन), समीर रकटे (सेक्रेटरी), हेमंत देशपांडे (खजिनदार), योगेश (मुन्ना) हिरे (जॉइंट सेक्रेटरी), चंद्रशेखर दंदणे व सतीश गायकवाड, तरुण गुप्ता, फय्याज गंजीफ्रॉकवाला यांची अगोदरच बिनविरोध निवड झालेली आहे.

दहा कार्यकारिणी सदस्यपदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीसाठी खेळाडू पॅनलच्या 10 उमेदवारांच्या विरोधात महेश भामरे हे एकमेव उमेदवार रिंगणात होते. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे एकूण आजीव 2,760 सभासदांपैकी काल 881 सभासदांंनी मतदानाचा अधिकार बजावला.

मतमोजणीनंतर महेश भामरे यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, त्यांना सर्वात कमी 129 मते मिळाली. तर मैदानातील खेळाडू पॅनलचे महेश मालवी, राघवेंद्र जोशी, महेन्द्र आहेर, शिवाजी उगले, रौफ पटेल, अनिरुद्ध भांडारकर, निखिल टिपरी, जगन्नाथ पिंपळे, विनायक रानडे, बाळासाहेब मंडलिक, असे एकूण दहाही उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या