Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-पुणे रेल्वेबाबत प्रशासनाचा 'हायस्पीड'

नाशिक-पुणे रेल्वेबाबत प्रशासनाचा ‘हायस्पीड’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दळणवळण ही विकास प्रक्रियेत महत्वाची बाब असते. नाशिक (Nashik), पुणे (Pune) आणि मुंबई (Mumbai) या सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचा धागा असलेल्या नाशिक पुणे-हायस्पीड रेल्वेला (Nashik Pune-High Speed Railway) गेल्या वर्षी परवानगी मिळाली…

- Advertisement -

त्यासाठी असलेल्या मार्गाची पाहणी, नकाशे जिल्हास्तरावर सर्वच तयार झाले. मात्र, भूसंपादन रखडले असल्याने ही हायस्पीड रेल्वे कधी सुरू होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे…

दरम्यान, भूसंपादनासाठी २४ कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. मात्र, लोहमार्गासाठी मूल्यांकन कसे असावे, याविषयीचे निकषच ठरत नसल्याने भूसंपादन लांबत आहे. तीन जिल्ह्यांतील भूसंपादनाच्या दरात भिन्नता आढळल्यास त्यातून शेतकऱ्यांच्या रोषाची लोकप्रतिनिधींना भीती आहे. तर भूसंपादनाचे पैसे देताना शासनाचे आर्थिक हित डावलले जायला नको, याची अधिकाऱ्यांना चिंता आहे,

लोहमार्गासाठी भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होऊन काही गावांचे प्रतिनिधिक मूल्यांकन करून ते बैठकीत सादर करण्याचे ठरले. जिल्हाधिकारी मांढरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत तशा सूचना देखील दिल्या आहेत. आता यावर मार्ग निघून प्रक्रिया जलद होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या