Thursday, May 2, 2024
Homeनगरजिल्हा बँक अनुकंपाधारकांचे आंदोलन स्थगित

जिल्हा बँक अनुकंपाधारकांचे आंदोलन स्थगित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा सहकारी बँकेने मागासवर्गीय अनुकंपा धारकांना नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याच्या मागणीसाठी 1 मे रोजी राष्ट्रपती भवन समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, शासनास चुकीची माहिती देऊन फसवणूक करणार्‍याव बँकेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू विचारमंचच्या वतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हा सहकारी बँकेने 2003 पासून अनुकंपा भरती बंद केल्याने अनुकंपा धारकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकेच्या 150 अनुकंपा धारकांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी द्यावी, किंवा नोकरी देण्याची मागणी केली आहे. देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासनावर वाढती जबाबदारी लक्षात घेऊन समाज हितासाठी हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

आर्थिक संकट व उपासमारीने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला असताना अनुकंपाधारक यांच्या कुटुंबात काहींनी आत्महत्या केल्यास याची जबाबदारी बँकेचे संचालक मंडळ व प्रशासनावर राहणारे आहे. बँकेत नोकर भरती प्रकरणी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करावी, संचालक मंडळास अनुकंपा धारकांना नोकरी देण्याचा ठराव घेण्याचा आदेश देण्याची मागणी अनुकंपा धारकांच्या वतीने करण्यात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या