Saturday, April 27, 2024
Homeधुळेजिल्ह्यातील 30 हजार शेतकर्‍यांना 324 कोटींचे पीक कर्ज वितरीत

जिल्ह्यातील 30 हजार शेतकर्‍यांना 324 कोटींचे पीक कर्ज वितरीत

धुळे Dhule। प्रतिनिधी

खरीप हंगाम (Kharif season) सुरू झाला असून शेतकर्‍यांनी (Farmers) पेरणीची तयारी (prepare for sowing) सुरू केली आहे. शेतकर्‍यांना बि- बियाणे, रासायनिक खते वेळेत खरेदी करता यावेत म्हणून शेतकर्‍यांना खरीप पीक (Kharif crop) कर्ज वितरण (loan disbursement) सुरू आहे. आतापर्यंत 30 हजार 716 शेतकर्‍यांना 324 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar) अभिजित देशपांडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांना शेतीची मशागत करून बि- बियाणे, रासायिक खतांची खरेदी करता यावी म्हणून धुळे जिल्ह्यात एक एप्रिल 2022 पासून पीक कर्ज वितरणास सुरवात झाली. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, एमएससी बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येते.

खरीप पीक कर्ज (Kharif crop loan) वितरणासाठी सन 2022- 23 या आर्थिक वर्षाकरीता 713 कोटी रुपयांचे उद्दिष्ट धुळे जिल्ह्यास देण्यात आले आहे. आतापर्यंत 30 हजार 716 शेतकर्‍यांना 324 कोटी 83 लाख चार हजार रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यात धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे 177 कोटी 20 लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकांतर्फे 135 कोटी रुपये, खासगी बँकांतर्फे 9 कोटी 36 लाख रुपये, तर ग्रामीण बँकेतर्फे 2 कोटी 96 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

पीक कर्ज वितरणाचा जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी वेळोवेळी आढावा घेतात. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला असून प्रत्येक सभासद शेतकर्‍याला पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित पात्र शेतकर्‍यांनीही पीक कर्ज घेवून शेतीत प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्यासह उपनिबंधक श्री. देशपांडे यांनी केले आहे.

पीक कर्ज वितरणास सुरुवात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कर्ज वितरणास एक एप्रिल 2022 पासून सुरवात झाली आहे. आतापर्यंत 30 हजार 716 शेतकर्‍यांना 324 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

-अभिजित देशपांडे, जिल्हा उपनिबंधक, धुळे

- Advertisment -

ताज्या बातम्या