Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप; पाहा कुणाच्या वाट्याला कोणता बंगला

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप; पाहा कुणाच्या वाट्याला कोणता बंगला

मुंबई | Mumbai

शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) करण्यात आला. यात एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता शिंदे सरकारमधील नवनियुक्त मंत्र्याना बंगल्यांचे वाटप (bungalows Allotment ) करण्यात आले आहे….

- Advertisement -

मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना शिवनेरी बंगला मिळाला आहे. यासोबतच पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना जेतवन बंगला मिळाला असून शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे.

तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना पन्हाळगड (ब ७) हा बंगला मिळाला आहे. याशिवाय उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लोहगड तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) रॉयलस्टोन बंगला मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या