Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदूरशिक्षणावर आधारीत एमबीए प्रवेश सुरू

दूरशिक्षणावर आधारीत एमबीए प्रवेश सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या माध्यमातून मास्टर ऑफ बिझनेस डमिनिस्ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवार (दि. 15) पासून सुरू झाली आहे. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास या प्रक्रियेतून प्रवेश दिला जाणार आहे. दूरशिक्षणावर आधारित या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल.

- Advertisement -

विद्यापीठामार्फत नियमित एमबीए अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु आर्थिक परिस्थिती किंवा नोकरी, व्यवसायक विषयक अडचणींमुळे पूर्णवेळ एमबीए शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने दूरशिक्षणातून एमबीए शिक्षणक्रमाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या शिक्षणक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असताना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवार पासून सुरू झाली आहे.

याकरिता ऑनलाइन स्वरूपात संकेतस्थळावर अर्ज करत पुढील प्रक्रिया राबवायची आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, एन्टरप्रेनरशिप, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, ऑपरेशन अ‍ॅन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट या मुख्य विषयांसह फार्मा न्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट, टुरिझम अ‍ॅन्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, बँकिंग मॅनेजमेंट या विषयांमध्ये एमबीए शिक्षणाची संधी उपलब्ध असेल.

दोन वर्षे कालावधीचा चार सत्रांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. यूजीसीशी संलग्न असलेल्या कुठल्याही विद्यापीठातून किमान पन्नास टक्के गुणांसह पदवी शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गासाठी 45 टक्के गुणांची अट असेल. तसेच पदवी शिक्षणानंतर किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. विद्यापीठांतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता प्रथम सत्राकरिता 15 हजार 205 रुपये शुल्क असेल. तर महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यातील विद्यापीठांतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 16 हजार 705 रुपये शैक्षणिक शुल्क असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या