MahaVikas Aghadi : शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम; ‘राष्ट्रवादी’ शिवाय निवडणूक लढण्याबाबत चर्चा

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्त्वाखालील एक गट राष्ट्रवादीतून (NCP) बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. या फुटीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटात विभागला गेला आहे…

शरद पवारांचा गट (Sharad Pawar’s Group) पक्ष फुटल्यानंतरही महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) आहे. मात्र पक्षफुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटी, तसेच शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ

अजित पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर शरद पवारांनी आपण भाजपसोबत (BJP) जाणार नसल्याचे म्हणत भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आपला प्लान बी तयार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्याने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने (Congress and Shiv Sena Thackeray Group) शरद पवार गटाशिवाय निवडणूक लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला फटका बसत असल्याने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने सावध भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाऊ-बहिणीचा आत्मदहनाच प्रयत्न; दोघेही पोलिसांच्या ताब्यात

तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी माझी काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा झाली असून महाविकासआघाडीत कुठलाही संभ्रम नाही असे म्हटले आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाच्या आगामी काळातील राजकीय हालचालींवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट बारीक लक्ष ठेवण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

“पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…”; लाल किल्ल्यावरून PM मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *