Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedबेशिस्त वाहनचालकांना शिस्त कधी?

बेशिस्त वाहनचालकांना शिस्त कधी?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नाशिक शहरात (nashik city) असलेल्या सर्वच सिग्नलवर (traffic signal) सध्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Violation of traffic rules) करून सिग्नल तोडण्याचे प्रकार वाढल्याने या बेशिस्त वाहनचालकांना शस्त लागणार कधी, असा प्रश्न उपस्थित आहे.

- Advertisement -

यापूर्वी नाशिकमधील सिग्नलवर वाहतूक पोलीस (Traffic Police) सतत दिसत होते. नाशकातील गंजमाळ सिग्नल (Ganjmal signal) व नागजी सिग्नल या दोन ठिकाणी बेशिस्त वाहनचालक मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते.

यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी येथे वाहतूक पोलिसाची नेमणूक (Appointment of Traffic Police) केल्याने येथील बेशिस्त वाहनचालकांची संख्या कमी झाली होती. मात्र सध्या वाहतूक पोलिसांअभावी येथील बेशिस्तीचे प्रमाण वाढत याखेरीज शहरातील सीबीएस (CBS) व मेहेर सिंग्नल (Meher Signal) येथे नेहमी वाहतूक पोलीस दिसून येतात.

त्यामुळे येथे वाहनचालक सिग्नलचे नियम पाळतांना दिसून येतात. मात्र शहरातील इतर सिग्नलवर फार कमी वेळा वाहतूक पोलीस (traffic police) दिसून येतात. सध्या आयुक्तालयाच्या हद्दीत असलेला पोलिसांचा ताफा हा लोकसंख्येच्या दृष्टीने कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे. सध्या करोनाचा (corona) प्रादुर्भाव संपल्याने या-ना त्याकारणाने बंदोबस्तात असल्याने सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसून येत नाही हे जरी खरे असले तरी सिग्नलवरील वाहनचालकांचा बेशिस्तपणा रोखणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

एक सिग्नल सुरु असतांना दुसर्‍या बाजूच्या सिग्नलवरून येणार्‍या बेशिस्त वाहन चालकामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. वाहनचालकांनी देखील आपली समाजाच्या प्रति असलेली नैतिक जबाबदारी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नाशकात विविध सामाजिक संस्था (Social organizations) नागरिकांनी वाहतुकीचे नियम (Traffic rules) पाळावे याकरिता विविध उपक्रम राबवित असतात.

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे (Former Police Commissioner Deepak Pandey) यांनी दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती केली होती, तिच हेल्मेटसक्ती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या कार्यकाळात सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांच्या तपासणीवरून दिसून येते. मात्र सिग्नलवर जर वाहतूक पोलीस असेल तर वाहतुकीचे नियम पाळणे बेशिस्त वाहनचालकांना भाग पडेल यात शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या