Thursday, May 2, 2024
Homeजळगावजिल्ह्यात 9 पोलीसांना महासंचालकांचे पदक जाहीर

जिल्ह्यात 9 पोलीसांना महासंचालकांचे पदक जाहीर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पोलीस दलातील (police force) सेवेत उत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगिरी (Excellent and remarkable service) करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालकांकडून पदक दिले जात असते. दरम्यान, जिल्ह्यातील 12 पोलिस कर्मचार्‍यांना महासंचालकांकडून पदक (Director General’s medal) जाहीर झाले असून दि. 1 मे रोजी होणार्‍या कार्यक्रमात पोली कवायत मैदानावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Pati) यांच्याहस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पोलीस दलात कार्यरत असतांना उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यभरातील पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालकांकडून पदक (Director General’s medal) दिले जाते. सन 2021 मध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजाविणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यात 12 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच तब्बल 12 कर्मचार्‍यांना (Police personnel) महासंचालकांकडून पदक जाहीर झाले असल्याने त्यामुळे जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे. दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस कवायत मैदानावर होणार्‍या पोलीस दलाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याहस्तेे पदक प्रदान केले जाणार आहे.

या पोलिसांना मिळाले पदक

फैजपुर येथील उपविभागयी पोलीस अधिकारी डॉ. कुणाल शंकर सोनवणे, पोलीस मुख्यालयातील संतोष गुलाब सुरवाडे, शहर वाहतुक मेघना मधुसुदन जोशी, महामार्गा सुरक्षा पथक गणेश शांताराम काळे, एटीसी रविंद्र भगवान पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे नंदकिशोर बाबुराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भुसावळ संदिप सुरेश चव्हाण, चाळीसगाव शहर वाहतुक हेमंत पौलाद शिरसाठ, पोलीस मुख्यालयातील रविंद्र फत्तू वंजारी, जळगाव एटीसी प्रवीण दगडू पाटील, अमळने पोलीस ठाण्यातील शरद तुकाराम पाटील, सायबर गुन्हे शाखेतील दिलीप केशव चिंचोले या पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालकाकडून पदक (Director General’s medal) जाहीर झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या