Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिंडोरी तहसिलदार 'या' कारणांसाठी रात्रभर ठाण मांडून..!

दिंडोरी तहसिलदार ‘या’ कारणांसाठी रात्रभर ठाण मांडून..!

ओझे । Oze

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी पात्रातुन रात्री वेळेस होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यात दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार यांना यश आले असून रात्री ११ ते ५ या वेळेत कादवा नदीच्या पात्रात रात्रभर स्थान मांडून बसून वाळू तस्करी करणा-यां तीन ट्रॅक्टर वर कार्यवाही करण्यात आली.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा रात्रभर जागे राहून कार्यवाही करणारे पहिले तहसिलदार म्हणून तहसिलदार पंकज पवार यांचे सोशल माडियावर अभिनंदन होत आहे.

दैनिक देशदूतने सलग दोन दिवस जनजागृती केल्यामुळे तालुका प्रशासन खडबडून जागे होऊन स्थानिक प्रशासनाला तहसिलदारांनी वाळू माफिया विरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मात्र स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही कार्यवाही न झाल्यांमुळे तहसिलदार पंकज पवार यांनी कादवा नदीपात्राच्या शेजारी उसाच्या शेतात थांबून अवैध वाळू उपसा करणा-यांवर कार्यवाही करून सदर वाळू उपसा करणारे वाहने दिंडोरी तहसिलमध्ये जमा करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कादवा नदीतून वाळूची अवैध वाहतुक केली जात आहे. त्यामुळे कादवा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन उन्हाळ्यामध्ये नदी पात्रात वारंवार कोरडे पडत आहे. त्यांचा फटका कादवा नदी पात्रा लगत असणा-या शेतकरी व पाणी पुरवठा योजनाना बसत आहे.

त्यामुळे कादवा नदी पात्रातील वाळू तस्करी थांबविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते, मात्र स्थानिक प्रशासन डोळेझाक करतांना दिसत होते. मात्र आज झालेल्या कार्यवाही मुळे स्थानिक प्रशासन जागे झालेले दिसून येते आहे.

दिंडोरी तालुक्यातील प्रशासन आज कडाडून जागे झाले असून सर्व तलाठी सजाच्या ठिकाणी हजर होऊन अवैध वाळू उपसा करणा-यांवर कार्यवाही करीत असल्यांचे दिसून येत आहे. शेवटी तालुक्यात होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसिलदार पंकज पवार यांना बाहेर पडावे लागले.

नंतर स्थानिक प्रशासनाला जाग येवून कार्यवाही होताना दिसत आहे. कादवा नदी पात्रात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसिलदार पंकज पवार महसूल सहाय्यक अमित पवार, कोतवाल महेश गांगोडे, सुभाष कराटे, मच्छिंद्र जगताप आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या