Friday, April 26, 2024
Homeधुळेगावठी कट्ट्याचा धाक दाखवून केली लूट

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून केली लूट

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील चितोडरोड परिसरात गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दोन तरुणांकडून 13 हजार 778 रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अरमान फायनान्स सर्व्हीसचे व्यवस्थापक राहूल भिमराव बाविस्कर आणि फिल्ड ऑफीसर निखिल प्रकाश सोमवंशी हे जुन्नर येथून दिवाणमळामार्गे चितोड रोडकडे येत असतांना याच रस्त्यावर असलेल्या गीते खडी क्रेशर जवळ त्यांच्या मागून दुचाकीवर तीन जण आले.

त्यांनी दुचाकी थांबवून दोघांना गावठी कट्ट्याचा धाक दाखविला व शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या जवळून 13 हजार 778 रुपयांचा ऐवज चोरुन नेला व तिघेजण पळून गेले.

यात राहूल आणि निखिल हे जखमी झाले. त्यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या