Thursday, April 25, 2024
Homeधुळेट्रकची अ‍ॅपेरिक्षाला धडक, चिमुकलीसह महिला ठार

ट्रकची अ‍ॅपेरिक्षाला धडक, चिमुकलीसह महिला ठार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड गावा शिवारात भरधाव ट्रकने अ‍ॅपेरिक्षेला दिलेल्या धडकेत एकाच कुुटुंबातील एक वर्षाच्या चिमुकलीसह महिला ठार झाले आहे.

- Advertisement -

तर तिन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. याबाबत शिरपूर तालुका पोलिसात नोेंद झाली आहे.

कनिष्का नरेश पवार (वय 1 वर्ष) व प्रमिला नारायण पवार (वय 60 रा. भुसावळ जि.जळगाव) अशी दोघा मयतांची नाव आहेत. तर शितल नरेश पवार (वय 24), वेदिका नरेश पवार (वय 4) व जितेंद्र नाना देशमुख (वय 47) रा. टिकळी ता. सेंंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश हे जखमी झाले आहेत.

पाचही जण आज दि. 17 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अ‍ॅपेरिक्षाने भुसावळ येथून ठिकळी येथे जात होते. त्यादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर हाडाखेड गाव शिवारात त्यांच्या रिक्षेला मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली.

त्यात कनिष्का पवार व प्रमिला पवार हे जागीच ठार झाले. तर तिघे जखमी झाले. त्यांना तत्काळ शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत वार्डबॉय नितेश गवळी यांच्या माहितीवरून शिरपूर तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या