Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशकात उद्या धम्म मेळावा

नाशकात उद्या धम्म मेळावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय बौद्ध महासभेतर्फे (Buddhist Mahasabha of India )शनिवार (दि.17) गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर विराट धम्म मेळावा (Dhamma Melava )आयोजित करण्यात आला असून यावेळी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातून एक लाखांहून अधिक लोक उपस्थित राहतील, अशी माहिती आयोजक भारतीय बौध्द महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीण बागुल, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख सल्लागार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, अंजली आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, अशोक सोनवणे, राजेंद्र पतोडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंकी शेख, मोहन अढांगळे, वामनदादा गायकवाड, जगदीश गवई, एस. के. भंडारे, अ‍ॅड. एस. एस. वानखेडे, भिकाजी कांबळे, देवशाला गायकवाड, संबोधी सोनकांबळे, प्रभाकर नांदेडकर उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्याच्या यशस्वीततेसाठी गौतम पवार, राजू जगताप, सतीश गांगुर्डे, मनोज गाडे, जयवंत निकम, संजय भोसले, प्रकाश जगताप, अरुण शिंदे, शोभा कटारे, रत्नाकर साळवे, हिरामण अहिरे, चावदास भालेराव, कृष्णा सोनवणे, विनोद शिंदे, नूतन साळवे, सुरेखा लोखंडे, उर्मिला गायकवाड, संजय साबळे आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या