Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळा : जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला करोना परिस्थितीचा आढावा

देवळा : जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला करोना परिस्थितीचा आढावा

भऊर । प्रतिनिधी

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी देवळा तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी देवळा डीसीएचसी व खाजगी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली..करोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या महिन्यात देवळा शहर व तालुक्यात लावण्यात आलेला कडक लॉकडाउन व नंतर राज्य शासनाने लागू केलेले कडक निर्बंध यामुळे हळूहळू रुग्ण संख्या कमी होत आहे.

- Advertisement -

तसेच मृत्यूचे प्रमाणही थांबले आहे. सद्या उमराणे व देवळा येथील कोविड सेंटरमधील उपचाराखाली दाखल रुग्णांना उपचारांसाठी ऑक्सिजन,रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच लसीकरण माहीम आदी सुविधांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. व याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दुपारी तीन वाजता देवळा तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला तसेच नुकतेच देवळा ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डीसीएचसी व खाजगी आदर्श कोविड सेंटरची पाहणी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी सी एच देशमुख, तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, गटविकास अधिकारी महेश पाटील, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, सहायक निबंधक सुजय पोटे, देवळा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे, उमराणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ मंदाकिनी दाणी, डॉ. सतीश वाघ आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या