Friday, April 26, 2024
Homeजळगावविवरे बुद्रुक उपसरपंचपदी नीलिमा संणसे विजयी

विवरे बुद्रुक उपसरपंचपदी नीलिमा संणसे विजयी

रावेर|प्रतिनिधी Raver

येथील सरपंचपदी अनुसूचित जमातीचे एकमेव निवडून आलेले युनूस तडवी यांची वर्णी लागली आहे.तर उपसरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नीलिमा संणसे यांचा एक मताने विजय झाला आहे.

- Advertisement -

येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी दीपक संदानशिव यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. यात सरपंच पदासाठी युनूस तडवी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने,त्यांची निवड घोषित करण्यात आली.यानंतर उपसरपंच पदासाठी वासुदेव नरवाडे, नीलिमा संणसे ,पंकज मोरे या तिघांचे अर्ज दाखल झाले होते,यातील पंकज मोरे यांनी माघार घेतल्याने,नीलिमा संणसे व वासुदेव नरवाडे एकमेकांविरुद्ध अर्ज असल्याने गुप्त पद्धतीने मतदान प्रकिया पार पडली, निवडणुकीत वासुदेव नरवाडे यांना ७ तर नीलिमा संणसे ८ मते मिळून त्यांचा विजय घोषित झाला आहे.

यावेळी युनूस तडवी,वासुदेव नरवाडे, विपीन राणे, शिवाजी पाटील,मनीषा पाचपांडे,ललिता पाचपांडे,पूनम बोंडे,पंकज मोरे,युसूफ खाटीक,भाग्यश्री पाटील,नौशादबी इस्माईल खा,दीपक राणे, ज्योती सपकाळ,नीलिमा संणसे, विनोद मोरे,रेखाबाई गाढे आदी १५ सदस्य उपस्थित होते. निवडणुकीत ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते व तलाठी तेजस पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या